केसीईच्या अभियांत्रिकीत पालक सभा संपन्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  केसीईच कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनॅजमेण्ट महाविद्यालयात पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. पालक सभेची सुरवात दीपप्रज्वलाने करण्यात आली.

 

प्रास्ताविक विद्यालयाच्या शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रज्ञा विखार यांनी मांडली , अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी पालकांशी हितगुज करून पालकांच्या महाविद्यलयाविषयी असलेल्या अपेक्षाविषयी चर्चा करण्यात केली. उपस्थित  पालक जयंत विवरेकर, सय्यद अली , महेश पाटील, संगीता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना आपल्या पाल्याविषयी होणारी प्रगती व असलेल्या अपेक्षा सभेत मांडल्या . पालकांना मार्गदर्शन पर उपप्राचार्य संजय दहाड यांनी विद्यर्थ्यंविषयी घ्यावयाची काळजी आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेख कसा वाढेल  त्यासाठी महाविद्यालय घेत असलेली विविध उपक्रम या विषयी पालकांशी संवाद साधला . सभेसाठी सर्व विभाग प्रमुख , प्राध्यापक उपस्थित होते. सभेचे सूत्र संचलन प्रा.अश्विनी देवराळे आणि आभार प्रा किरण पाटील यांनी व्यक्त केले तसेच  प्रा.अविनाश सूर्यवंशी, प्रा. राहुल पटेल  आणि प्रा स्नेहल भंगाळे यांनी मोलाचे सहकार्य केले .

Protected Content