केसीईचे आयएमआरमध्ये 37 व्या एमबीए बॅचचा इंडक्शन प्रोग्राम

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीईचे आय एम आर मध्ये एमबीए च्या 37 व्या बॅचच्या अभीमुखता कार्यक्रमाची सुरवात झाली. संपुर्ण सात दिवस हा कार्यक्रम चालणार आहे.

यात नवीन बॅचच्या विद्यार्थ्यांना आयएमआरची ओळख तसेच विद्यार्थीभिमुख दृष्टिकोनातुन ओळख करुन दिली जाणार आहे. त्यासाठी काही विशेष पाहुणे म्हणून प्रातिनीधीक स्वरुपात पहिल्या बॅचचे किंवा पंचवीसाव्या बॅचचे विद्यार्थी देखिल नवीन विद्यार्थ्यांना संबोधित करतील. या कार्यक्रमाला संचालक प्रा. डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी संबोघित केले. त्यांनी संस्थेने कोवीड काळानंतर घेतलेली भरारी म्हणजे नॅक ए ग्रेड एक्रिडीशन आणि खान्देशातील पहिली एन बी ए एक्रिडेटेड संस्था म्हणुन सार्थ अभिमान व्यक्त केला. यानंतर शैक्षणिक संचालक डॉ. तनुजा फेगडे, एम बी ए समन्वयक डॉ. पराग नारखेडे, एम बी ए फार्मा समन्वयक कविता पवार यांनी विद्यार्थ्यांशी प्रथम सत्रात संवाद साधला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  प्रियांका चावरिया यांनी केले तर आभार पुनित शर्मा यांनी मानले.

दुसर्‍या सत्रात सकीना लेहरी यांनी भावनिक बुद्धिमत्ता याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आजुबाजुच्या लोकांचे कौतुक करा – ध्येय निश्चित करण्याला प्राधान्य द्या, इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःला प्रेरित करा हे आवर्जून सांगितले.
दुसर्‍या दिवसाची सुरवात डॉ. युवराज परदेशी यांचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन या महत्त्वपूर्ण विषयाने झाली. त्यांनी उद्योजक होण्यासाठीच्या संधी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. नोकरी देणारे व्हा नोकरी शोधणारे नाही हे सांगतांना त्यांनी , स्टार्टअपचे नियोजन कसे करावे, निधी कसा मिळवावा, व्यवसाय मार्केटाइज कसा करावा,हे अतिशय तंत्रशुद्ध पध्दतीने त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. तुमच्या नावीन्यपूर्ण आणि व्यावसायिक कल्पनांवर लक्ष केंद्रित करा हेही त्यांनी आवर्जून नमूद केले. त्यानंतर सत्र दोन मध्ये आय एम आर चे माजी विद्यार्थी आणि तज्ञ काॅन्सिलर पंकज व्यवहारे यांनी रोजगारक्षमता काय असते,कामाप्रती उच्च दृष्टी आणि स्वप्न सेट करतांना, क्षमता कौशल्ये कशी विकसित करावी – उद्योगासाठी आवश्यक असलेल्या गुणांवर लक्ष केंद्रित करण्याचे हे सुत्र विद्यार्थ्यांना लक्षात आणुन दिले.

नंतर सत्र तीन मध्ये “तुम्ही जन्मत: नेता आहात का? या विषयावर बौद्धिक घेतांना  गिरीश कुलकर्णी यांनी  तुम्ही कोणत्या प्रकारचे नेते आहात ते ओळखा, नेत्याचे गुण समजून घ्या, नेतृत्व ही आजच्या आधुनिक युगाची नितांत गरज आहे. तिसर्‍या दिवशी पहिल्या सत्रात” कॉर्पोरेट नेतृत्व” या विषयावर आय एम आर च्या पहिल्या बॅचचे माजी विद्यार्नेतृत्व” गनी मेमन यांनी कॉर्पोरेटमध्ये काम करण्यापेक्षा स्वतःचे साम्राज्य उभे करा, दिवा स्वप्नात वेळ वाया घालवू नका, कॉर्पोरेट जीवनासाठी कठोर परिश्रम आणि सातत्य आवश्यक आहे हे विद्यार्थ्याना समजावून सांगितले. आजच्या दिवशीच्या दुसर्‍या सत्रात आय एम आर ची माजी विद्यार्थीनी आणि तीन वर्षांपुर्वी ची गोल्ड मेडल विजेती निधी कोठारी यांनी सुवर्णपदक विजेते कसे व्हावे याविषयी विद्यार्थांशी मनमोकळी चर्चा केली. या उपक्रमासाठी डॉ ममता दहाड, पुनीत शर्मा आणि डॉ योगेश पाटील मेहनत घेत आहेत. जून चार दिवस हा कार्यक्रम चालणार आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content