केसीईचे आयएमआरमध्ये “कोविड १९” बाबत आॅनलाईन व्याख्यान

जळगाव, प्रतिनिधी   केसीई आयएमआरमध्ये ‘कोविड १९ समजवून घ्या शास्त्रशुद्ध पद्धतीने’ या विषावर  डॉ. रोहन आणि शाल्मी केळकर यांचे आॅनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यात त्यांनी कोविड लसीकरण व समज गैरसमज व कोविडबाबत मार्गदर्शन केले. 

 

अठरा वर्षावरील लसीकरण, वेगवेगळ्या प्रकारच्या लसी, त्यांच्याविषयी समज गैरसमज, लसीकरणानंणर घ्यायची काळजी, येणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय, दोन लसीकरण डोस- मधील अंतराविषयी बदलते मतप्रवाह, लस का आवश्यक? याविषयी अनेक विषयांना समर्पक विष्लेषण करीत डॉ. रोहन केळकर आणि डॉ. शाल्मी केळकर यांनी  आॅनलाईन सादरीकरण  केले.  या आॅनलाईन बेविनारच्या सुरवातीला डायरेक्टर प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी  विद्यार्थ्यांना जसे उपलब्ध होईल तसे तातडीने लस घेण्याविषयी आवाहन केले .विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. रोहन आणि शाल्मी यांनी लसीकरण केंद्र कुठे असतील, कोवीशील्ड आणि कोवॅक्सिन मधील फरक, लस घेतांना काय काळजी घ्यायची? ब्लडप्रेशर, डायबिटीस, मासिक पाळी, ब्रेस्ट फिडींग दरम्यानची सावधगिरी, कोरोना तिसर्‍या लाटेविषयीच्या शक्यता आणि डाॅक्टरांच्या स्तरावरील – सरकारी स्तरांवरील तयारी अश्या विवीध मुद्दयांवर चर्चा केली. डॉ रोहन आणि शाल्मी केळकर यांनी कोविड माहामारीच्या संपुर्ण काळात जळगान सिव्हिल हाॅस्पिटल मध्ये त्यांनी बजावलेल्या सेवेविषयीचे अनुभव देखिल विद्यार्थ्यांसोबत शेअर केलेत. आभार साधना थत्ते यांनी मानले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.