केटीवेअरमध्ये पडल्याने शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू

नेरी येथील घटना; पाचोरा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फवारणीसाठी शेतात जात असलेल्या शेतकऱ्याचा गडद नदीच्या केटीवेअरमध्ये पाय घसरून पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धर्मा नामदेव मोरे (वय-५५) रा. नेरी ता. जामनेर असे मृत अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धर्मा मोरे हे अल्पभूधारक शेतकरी बुधवारी १४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आपल्या शेतातील पिकास फवारणी करण्यासाठी जात असतांना गडद नदीच्या केटीवेअर जवळ त्यांचा पाय घसरला व ते केटीवेअरमध्ये पडल्याने त्‍यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सदरचा प्रकार शेजारील ग्रामस्थांच्या मदतीने केटीवेअर मध्ये शोध घेत असतांना सुमारें एक तासानंतर धर्मा मोरे यांचा मृतदेह आढळून आला. धर्मा मोरे यांना ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात आणले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. मयत धर्मा मोरे यांचे पाश्चात्य पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार असुन त्यांचे निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच गडद नदीवरील केटीवेअर हा मृत्युचा सापळा बनला असुन सदरचा केटीवेअर चुकीच्या पद्धतीने बनवला आहे. याबाबत लक्ष देणे गरजेचे ठरत आहे. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content