केजरीवाल यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्रीयमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी आरोप केला की, ‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केंजरीवाल यांनी तिरंगा ध्वजाचा अपमान केला आहे. केंद्रीयमंत्र्यांनी उपराज्यपाल अनिल बैजल, केजरीवाल यांना पत्र देखील पाठवले आहे.

 

केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांचे म्हणणे आहे की, मी काही दिवसांपासून मुख्यमंत्री केजरीवाल यांची पत्रकारपरिषद पाहत होतो, त्यांच्या पाठीमागे लावण्यात आलेल्या दोन ध्वजांमधील पांढऱ्या रंगावर हिरवी पट्टी वाढवली गेली आहे.  गृहमंत्रालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करण्यात आले आहे. मी यासंदर्भात अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे, मी उपराज्यपालांना देखील पत्राची प्रत पाठवली आहे. कोरोना संकट काळात विविध मुद्यांवरून केंद्र व दिल्ली सरकार आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.