केंद्रीय विद्यालयाचे स्नेहसंमेलन व परितोषिक वितरण समारोह उत्सहात

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरातील केंद्रीय विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला

केंद्रीय विद्यालयात आजादी का अमृत महोत्सव व नवरस या थीमवर स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी, खेळाडूंचा गुणगौरव करण्यात आला. जळगाव येथे मागील पंचवीस वर्षापासून केंद्रीय विद्यालय या शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर आहेत. सध्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावा त्यांच्यामधून जळगाव व केंद्रीय विद्यालयाचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन स्नेहसंमेलनाचे मुख्य अतिथी तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल.महेश्वरी यांनी केले. याप्रसंगी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीनाथ फड, पोदार इंटरनॅशनल स्कूल प्राचार्य गोकुळ महाजन, विद्यालय व्यवस्थापन समिती सदस्य तथा प्राध्यापक डॉ. व्ही. एम. रोकडे, विद्यालय व्यवस्थापन समिती सदस्य शिरीष अडम आदी मान्यवर व विद्यालयाचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे विद्यालयाचे प्राचार्य मॅथ्यू अब्राहम यांनी याप्रसंगी नमूद केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक व जळगावातील नागरिक उपस्थित होते. केंद्रीय विद्यालयाचा वार्षिक आढावा प्राचार्य मॅथ्यू अब्राहम यांनी सादर केला. त्यात केंद्रीय विद्यालयाच्या मागील पंचवीस वर्षाचा आढावा घेताना कोरोना काळात विद्यालयाच्या कार्याचा उल्लेख प्रामुख्याने करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य, नाटक, मूकनाटक, वक्तृत्व, गीत गायन, योग प्रस्तुती अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. यावेळी क्रीडा व कला क्षेत्रातील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्यात आला. स्नेहसंमेलनाच्या मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती सोजवल, संतोष पाटील, इंद्रायणी वडसत्ते यांनी केले.
लेझीम पथक, ढोल पथक, नियोजन समितीची धुरा अमिता निकम यांनी सांभाळली. आभार जी. एल. अहिरवार यांनी मानले.

वार्षिक स्नेहसंमेलनच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मीनाक्षी रा. पाटील नितीन आरसे, एकनाथ सातव, मिथुन ढीवरे, विवेक साहनी, धर्मेंद्र सिंह, मीनाक्षी मा. पाटील, पुनम खरात, शैलजा मीणा, संतोष बुनकर, पूनम जमधडे, मोहन शेकोकारे, प्रणिती सोनवणे, दीपिका खंडेतोड, यामिनी देवकर यासोबत शिक्षकेतर कर्मचारी प्रमोद वागळे, राज सुरवाडे, ज्ञानेश्वर पाटील व विद्यार्थी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content