केंद्राने महाराष्ट्राशी दुजाभाव केला नाही -आठवले

 

मुंबई, वृत्तसंस्था  ।   केंद्र सरकार ने महाराष्ट्राला ऑक्सिजन;लस आणि रेमडीसीविर इंजेक्शन चा देशात सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला केला आहे. केंद्राने कधी ही महाराष्ट्राशी दुजाभाव केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महाराष्ट्राकडे लक्ष आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे.

 महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत आहे. ही वेळ आरोप करण्याची नाही. केंद्रावर आरोप करण्यापेक्षा रुग्णांचे जीव वाचविण्याकडे लक्ष द्यावे.महाराष्ट्र सरकार च्या सर्व मंत्र्यांनी कोरोना रुग्ण वाचविण्याकडे ; कोरोनाचा लाट थोपविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. रुग्णांना बेड मिळत नाही;ऑक्सिजन मिळत नाही;रेमेडिसीवर इंजेक्शन मिळत नाही त्याकडे लक्ष द्यावे. उठसुठ केंद्र सरकार वर आरोप करून आपले पाप  झाकता येणार नाही असा टोला ना रामदास आठवले यांनी  महाविकास आघाडी सरकारला  एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आज लगावला आहे. 

मागील वर्षी महाराष्ट्रात कोविड सेंटर उभारण्यात आले होते.यंदा कोरोना रुग्णांसाठी राज्य सरकार ने योग्य सोया सुविधा नियोजन केले नाही.त्यामुळे राज्यात अनेक रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. यास कोण जबाबदार असा सवाल ना रामदास आठवले यांनी राज्य सरकार ला विचारला असून केवळ केंद्र सरकारवर आरोप करण्यापेक्षा रुग्णांचे जीव वाचविण्याकडे लक्ष द्यावे अशी सूचना ना रामदास आठवले यांनी राज्य सरकार ला केली आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.