कॅम्पस इंटरव्यूमध्ये आयएमआरच्या १३ विद्यार्थ्यांची निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | केसीई संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट  अँँड  रिसर्चच्या एमबीएच्या ५ विद्यार्थ्यांची कॅम्पस  इंटरव्यूद्वारे निवडकरण्यात आली आहे.

 

इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट  अँँड  रिसर्चमध्ये आयोजित कॅम्पस  इंटरव्यूत होम फर्स्ट फायनान्स कंपनीत निवड झाली आहे.  ज्यात अनमोल त्यागी, महेंद्र पाटील, प्रगती बुवा, कोमल झीनझुनवाडिया आणि श्रीनिवास सराफ शामिल आहेत. कंपनीच्या वतीने आयएमआरची पूर्व छात्रा आणि मेनेजर निधी कोठारी हिने निवड प्रक्रिया पूर्ण केली. तसेच ७ विद्यार्थी हे पुण्यातील एचडीबी ह्या कंपनीत निवडले गेले तर एक विद्यार्थी हा एचडीएफसी होम लोन्स मध्ये निवडला गेला आहे. विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे आणि एकेडमीक डीन डॉ. तनुजा फेगडे ह्यांचे मार्गदर्शन लाभले तर इंटरव्ह्यूचे नियोजन ट्रेनिंग एंड प्लेसमेंट हेड प्रा. पुनीत शर्मा ह्यांनी केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!