कुसुंबा येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । कौटुंबिक जाचाला कंटाळून ४० वर्षीय तरूणाने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

adv final
WhatsApp Image 2020 08 11 at 2.57

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महादेव पंडीत शिरसाठ (वय-४०) रा. आंबेडकर नगर, कुसुंबा हे आपल्या पत्नी, दोन मुलांसह राहतात. एमआयडीसीतील एका कंपनीत चालक म्हणून कामाला होते. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कौटुंबिक वाद असल्याचे घरातील वातावरण बिघडले होते. या नैराश्येतून महादेव यांनी रविवारी सायंकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केली. सायंकाळी महादेवची पत्नी माला घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!