कुसुंबा येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथील प्रमोद रविंद्र खैरनार (वय-२०) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुबा येथे प्रमोद खैरनार हा आई, वडील व लहान भावासोबत राहत होतेा. प्रमोदने दोन वर्षांपुर्वीच गावात सलूनचे दुकान टाकले होते. त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून तो आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. दरम्यान, आज शुक्रवारी १४ जानेवारी रोजी सकाळी त्याचे आई, वडील व लहान भाऊ कामावर निघून गेले होते, तर प्रमोद हा घरी एकटाच होता. याचवेळी त्याने राहत्या घरात छताच्या हुकाला गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही . याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!