कुसुंबा गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

एमआयडीसी पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शनिवार १६ जुलै रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, कुसुंबा गावात राहणारी १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वस्तव्याला आहे. शुक्रवारी १५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मुलगी ही घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण करून फूस लावून पळवून नेले. रात्री उशीरापर्यंत मुलगी ही घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही आढळून आली नाही. अखरे शनिवारी १७ जुलै रोजी दुपारी मुलीच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.