कुंभारखेड्यात अवैध सावकारावर छापा : परिसरात खळबळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील कुंभारखेडा गावात आज सहकार खात्याच्या पथकाने छापा टाकला असून हे प्रकरण अवैध सावकारीशी संबंधीत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

 

यावल आणि रावेर तालुक्यातील अवैध सावकारांचे प्रकरण हे गेल्या अनेक महिन्यांपासून गाजत आहे. मध्यंतरी जिल्हा उपनिबंधकांनी १६ सावकारांच्या पाशातून जमीन मुक्त करून मूळ मालकांना दिली होती. यानंतर संबंधीतांनी या प्रकरणी दाद मागितली असता काही प्रकरणी पुनर्विलोकन तर काही प्रकरणी जैसे थे असा निर्णय देण्यात आला आहे. एकीकडे या सर्व घडामोडी सुरू असतांना दुसरीकडे आज कुंभारखेडा येथे छापे टाकण्यात आले आहे.

 

लाईव्ह ट्रेंडस न्यूजने या संदर्भात सहकार खात्यातील अधिकार्‍यांशी संपर्क केला असता, त्यांनी कारवाईला दुजोरा दिला. तथापि, या संदर्भातील विस्तृत माहिती ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तर संबंधीत व्यक्तीच्या घरी सकाळीच पथक दाखल झाल्यानंतर ही बातमी परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content