कुंभारखेडा येथे ग्रामस्थांतर्फे स्व.हरीभाऊ जावळे यांना भावपूर्ण श्रध्दांजली


सावदा प्रतिनिधी । माजी आमदार स्व. हरीभाऊ जावळे यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांना धक्का दिला आहे. सावदा जवळ असलेल्या कुंभारखेडा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने शोकसभेचे आयोजन करून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी कुंभारखेडा लोकनियुक्त सरपंच लता बोंडे, उपसरपंच पुनित पाटील, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष राष्ट्रवादी विलास ताठे, भास्कर बोंडे, प्रविण बोंडे, भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस भरत बोंडे, गंगाराम राणे, अशोक पाटील, भूषण भारंबे, रविंद्र महाजन, अमेय तडवी, भाजप युवा मोर्चाचे शाखाध्यक्ष प्रणय बढे, कपिल चौधरी, संदीप अटावलकर, रमेश पाटील, महेंद्र महाजन, घनश्याम बोंडे, पी.के. बोंडे, ग्रामसेवक श्रीकांत पाटील, मुनाफ तडवी यांच्यासह अनेक मान्यवर सोशल डिस्टींगशनचे पालन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.