किराणा दुकानासह मेडीकलातून हजारोंची चोरी

चाळीसगाव शहरातील आदर्श नगरातील घटना

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील आदर्श नगरातील किराणा दुकान व मेडीकलच्या शेटरचा कुलूप तोडून २७ हजार पाचशे रुपयांचा रोकड अज्ञाताने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील हिरापूर रोडवरील आदर्श नगरातील ओमचंद हुकूमचंद शर्मा (वय-३६) हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्याला आहे. किराणा दुकान चालवून शर्मा हे आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवित असतात. दरम्यान नेहमीप्रमाणे शर्मा हे २३ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास दुकानाला कुलूप लावून घरी निघून गेले. सकाळी पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांना दुकानाचा शटर उघडा दिसला. त्यावर दुकानातील ड्राव्हरमध्ये ठेवलेले २४ हजार रुपये रोकड दिसून आले नाही. तर दुसरीकडे याच नगरातील श्री. गणेश मेडिकल ॲण्ड होलसेल दुकानातून ३ हजार पाचशे रुपये रोख असे एकूण २७ हजार पाचशे रुपये अज्ञाताने लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून शर्मा यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के.के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास महेंद्र पाटील हे करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content