किराणा दुकानातून कामगारानेच लांबविला साडेपाच लाखांचा मुद्देमाल

रामेश्वर कॉलनी परिसरातील घटना; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनीत एका किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणानेच दुकानातील ५ लाख ६९ हजार ५३० रुपयांचा किराणा माल चोरुन नेल्याची धक्कादायक घटनाा समोर आली आहे, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत जावईगल्लीत नंदकिशोर भागवत  शिंदे वय ४३ हे वास्तव्यास आहे. त्यांचे रामेश्वर कॉलनीतच श्री समर्थ कृपा नावाने किराणा दुकान आहे. या दुकानात विशाल शरद पाटील या नावाचा तरुण कामाला होता, ५ फेब्रुवारी २०२३ ते १४ मार्च दरम्यान विशाल याने वेळावेळी किराणा दुकानातून तब्बल ५ लाख ६९ हजार ५३० रुपयांचा किराणा चोरुन नेला, १४ मार्च रोजी सायंकाळी प्रकार समोर आल्यानंतर दुकान मालक नंदकिशोर शिंदे यांनी दुसऱ्या दिवशी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन विशाल शरद पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक सुधीर साळवे हे करीत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content