किनगाव येथे जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक विनोद पाटील यांचा सत्कार

यावल, प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विजयी झालेले नवनिर्वाचित संचालक विनोद पाटील (देशमुख ) यांचा आपल्या मूळ गावी किनगाव येथे भव्य नागरी सत्कार किनगाव दोन्ही ग्रामपंचायत तसेच विविध कार्यकारी सोसायटी व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.

 

जिल्हा बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजय संपादन केलेले विनोद पाटील (देशमुख) यांचा नागरी सत्कार किनगाव येथे करण्यात आला. याप्रसंगी तालुक्यातील किनगाव ,डांभुर्णी ,गिरडगाव , चिंचोली, आडगाव, कासारखेडा, नायगाव, मालोद, उंटावद अशा गावातूनही विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी तसेच ग्रामपंचायतचे सरपंच तसेच सदस्य आणि प्रसारमध्यांचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांनीही नवनिर्वाचित संचालक विनोद पाटील (देशमुख )यांचा यथोचित सन्मान याप्रसंगी केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी होते तर मंचावर अन्न व औषद्य विभाग मुंबई माजी उपायुक्त नानासाहेब विजय पाटील, जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र सूर्यभान पाटील , शशिकांत पाटील, प्रदीप (सतीश)दादा देशमुख ,यावल पसचे सदस्य आबासाहेब उमाकांत पाटील, राष्ट्रवादी चे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे,रामचंद्र विष्णू चौधरी आदी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!