किनगाव परिसरातील गावांसाठी लसीकरणाला सुरूवात

 

यावल  : प्रतिनिधी  । तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत काल न्यूमोनिया आणि इतर आजारांवरच्या लसीकरणाचा शुभारंभ पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला

 

यावेळी बाळांना लसही देण्यात आली याप्रसंगी महाराष्ट्र सरपंच संघटनेचे सरचिटणीस व जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरूजीत चौधरी,  किनगाव बुद्रूकचे उपसरपंच लुकमान तडवी हे प्रामुख्याने उपस्थित होते . पीसीव्ही लस बालकांना वयोगट ९ महिन्यांच्या आत ३ वेळा देण्यात येईल पहिला डोस ६ आठवडे तर दुसरा डोस १४ आठवडे आणि तिसरा बूस्टर डोस हा ९ महिन्यानंतर देण्यात येईल त्यापासून न्यूमोनिया, मेंनजायटिस आणि रक्तातील आजार रोखण्यास मदत होते, या आजाराचा १ वर्षांच्या आतील लहान बालकांना जास्त धोका असतो  असे प्राथमिक आरोग्य केंन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा महाजन यांनी सांगीतले

 

पुरोजीत चौधरी यांनीही नागरीकांना आवाहान केले की ही लस खाजगी दवाखाण्यात  प्रत्येकी २००० रूपयांना मिळते आणि गरीबांना खाजगी दवाखाण्यात खर्च करणे परवडत नाही तीच लस आता सरकारी  दवाखान्यात मोफत असल्यामुळे  नागरीकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा

वैदयकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील , आरोग्यसेविका के. जी. इंगळे , आरोग्यसेवक दीपक तायडे, निलेश पाटील, विठ्ठल भिसे, जिवन सोनवणे , मदतनीस सुरेखा माळी , शिपाई सरदार कानाशा , लॅब टेक्निशियन प्रिया पाटील , सफाई कामगार आरती कंडारे , जीवन महाजन , वाहन चालक कुर्बान तडवीसह बालके व माता उपस्थीत होत्या

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!