किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा लासिकारणात उच्चांक

यावल,  प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने यावल तालुक्यात सर्वप्रथम १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करून एक नवा  उच्चांक गाठला आहे. 

 

जिल्हा परिषदच्या सदस्या अरुणाताई रामदास पाटील यांच्या विशेष प्रयत्नतुन २०००  कोविशील्ड लस प्राप्त झाले होते.  किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या  डॉ.  मनिषा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली २२०० लोकांना लस देऊन किंनगव आरोग्य केंद्राने यावल तालुक्यात उच्चाकं गाठून उल्लेखनिय कार्य केले आहे. याबद्दल डॉ. मनिषा महाजन यांनी सांगितले की ,माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास पाटील यांनी किंनगव येथे प्रतिबंध लसीकरणासाठी नागरीकांची होणारी तारांबळ पाहता अधिका अधिक लस कसे मिळेल यावर अधिक लक्ष केंद्रित केले. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि जि. प. सदस्या अरूणाताई पाटील यांनी २००० लस आम्हाला उपलब्ध करून दिल्यात. आज आम्ही २००० लसीचे वितरण करताना गिरडगाव ३३०,उंटावद २७५, मालोड २२० ,आडगाव ४८४ , किंनगव६१६  डोंनगव २७५अ से लसीचे डोस १८ वर्षा वरील नागरिकांना देण्यात आल्या. त्यात उंटावद आणि गिरडगाव येथे पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरणाचे कार्य झाले. दिवसभरात आरोग्य केंद्राच्या माध्यमातुन २२०० लस देऊन उच्चांक गाठला किनगाव प्राथमिक आरोग्य केन्द्राअंतर्गत येणाऱ्या उंटावट व गिरडगाव येथे १०० टक्के लसीकरण झाले असुन यासाठी आरोग्य यंत्रणेचे रात्री उशीरा १०: १५ पर्यंत काम सुरू ठेवून विक्रम नोंदविला. याकार्यासाठी सुरुवातीपासून नियोजन लसीकरण कार्यक्रम आखला. त्या करीता सर्वाचे  सहकार्यांचे अमूल्य होते.  सर्वांच्या एकजुटी शिवाय हे काम होऊ शकले नसते असे डॉ मनिषा महाजन यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी  बोलतांना सांगितले. यासाठी माझे सर्व सहकारी डॉ. अमोल पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अशपाक, डॉ. वकार, डॉ. मोहसीन, डॉ धनंजय, तसेच आरोग्य सहाय्यिका उषा पाटील, आरोग्य सेविका कुमुदिनी इंगळे, भावना वारके, कविता सपकाळे, शीला जमरा, कल्पना सूर्यवंशी, मंगला सोनवणे,  नावादी बरेला, आरोग्य सेवक,विठ्ठल भिसे, दीपक तायडे, जीवन सोनवणे, मनोज बरेला ,डेटा एन्ट्री  ऑपरेटर भुपेंद्र महाजन, रवींद्र न्हावी,  प्लेबोटोमिस्ट जीवन महाजन, शिपाई, सरदार कानाशा, वाहन चालक कुर्बान तडवी यांनी विशेष प्रयत्न केले आणि आमची मोहीम फत्ते केली .

यामुळं डॉ.मनिषा महाजन व त्यांचं टीम चे जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ भीमशकांर जमादार,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पोटोडे डॉ प्रमोद पांढरे,यांनी कौतुक केले ,तर किंनगव येथील सरपंच सौ निर्मला संजय पाटील यांनी आमच्या गावाला  मनीषा महाजन डॉक्टर मिळाले म्हणून आम्ही कौतुक करतो पण असे डॉक्टर सर्व कडे असले पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळेल असे बोलून अभिनंदन केले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!