का. उ. कोल्हे विद्यालयातून साक्षी पाटील प्रथम

जळगाव, प्रतिनिधी ।  येथील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय व  माध्यमिक विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत  शंभर टक्के निकाल लागला असून विद्यालयातून साक्षी पाटील हिने प्रथम क्रमांक पटकविला आहे.  

 

काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय व  माध्यमिक विद्यालयातून साक्षी निळकंठ पाटील हिने ४७१ गुण (९४.९ टक्के)  मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय क्रमांक रोहिणी विनोद बारी ४५३ (९०.६ टक्के).  मानसी रवींद्र कुंभार ४५२(९०.४० टक्के) मिळविले आहे तर मागासवर्गीयमधून ऋषिकेश सुरेश लोहार याने ४३३  गुण(८६.६ टक्के) मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे लोक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय पंडितराव कोल्हे व संस्थेचे संचालक ललित विजय कोल्हे, चिटणीस अवधूत गंगाराम पाटील, चिटणीस सतीश दशरथ खडके, मुख्याध्यापिका जे. आर. गोसावी, उपमुख्याध्यापक एस. व्ही. ठोसर, एच. जी.काळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!