काश्मिरातील सर्वपक्षीय समूहावर भाजपची टीका

राज्याला पुन्हा विशेष दर्जा मिळणे अशक्य

शेअर करा !

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । श्रीनगरातील सर्वपक्षीय बैठकीत जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. आता भारतीय जनता पक्षाने अशी मागणी करणाऱ्या समूहाला ‘देखावा’ असे म्हटले आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्याविरोधात राजकीय पक्षांची एकजूट झाली आहे. श्रीनगरमध्ये पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्ससह एकूण ६ पक्षांच्या झालेल्या बैठकीत पीपल्स अलायन्सची स्थापना केल्याची घोषणा करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या गुपकार रोडवरील निवासस्थानी झालेल्या बैठकीत मेहबूबा मुफ्ती यांनीही भाग घेतला होता.

हा केवळ एक मुखवटा आहे. जम्मू आणि काश्मीरला आता पुन्हा विशेष दर्जा प्राप्त होणार नाही, हे प्रत्येक काश्मिरी जाणतो. ही एक चाल आहे. मात्र २०१९ ने १९५३ ला बदलून टाकले ही मोदी सरकारसाठी चांगली गोष्ट आहे. वेलकम टू रियलपोलिटिक, असे राम माधव यांनी म्हटले आहे.

 

खरे तर, जम्मू आणि काश्मीर राज्याच्या दर्जामध्ये बदल, विभाजन आणि कलम ३७० हटवण्याच्या विरोधआत जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. नजरबंदीतून सुटका झाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला, पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांच्या समूहाची बैठक झाली होती. या बैठकीत जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

समूहात माजी मुख्यमंत्री महेबूबा मुफ्ती आणि सज्जाद लोन यांच्यासोबत ४ ऑगस्टला एक संयुक्त निवेदन जारी करणारे जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय पक्ष आहेत. कलम ३७० हटवणे हे घटनाविरोधी असल्याचे समूहाचे म्हणणे आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!