कार-दुचाकी अपघातात दोघे गंभीर जखमी !

हिंगोणा-सांगवी रस्त्यावरील घटना; एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सांगवी ते हिंगोणा रस्त्यावर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोन गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली आहे. जखमी झालेल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, चारचाकी वाहन क्रमांक (एमएच १९ सिझेड ७८o६) ने लक्ष्मण नारायण सपकाळे हे त्यांच्याकडील चारचाकी वाहनाने फैजपुरकडून यावलकडे येत असतांना समोरून दुचाकीची समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीवरील कलीम सलीम तडवी (वय-२०) रा. साकळी ता. यावल आणि नदीम खान सलीमखान (वय-१८) रा. साकळी ता यावल हे दोघे गंभीर जखमी झाले. तर अशपाक बिसमील्लाह तडवी रा . साकळी व चारचाकी वाहन चालक लक्ष्मण नारायण सपकाळे वय५९ हे या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत.

सर्व जखमींवर फैजपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातस्थळी फैजपुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर, पोहेकॉ राजेश बऱ्हाटे यांनी धाव घेऊन जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. फैजपुर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content