कार्यालयाच्या बाहेरुन कर्मचाऱ्याची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पारिक पार्कजवळील एका कार्यालयाच्या बाहेरुन कर्मचाऱ्याची दुचाकी चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी बुधवार, १७ मे रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव धरणगाव तालुक्यातील टहाकळी येथे सुनील जानकीराम पाटील हे वास्तव्यास आहे. ते जळगाव शहरातील पारिक पार्क जवळ असलेल्या एका खाजगी कंपनीच्या कार्यालयात नोकरीला आहे. १० मे रोजी सुनील पाटील हे नेहमीप्रमाणे डयुटीवर आले असता त्यांनी सकाळी साडेआठ वाजता त्यांची एम.एच. १९ बीबी ८३६१ या क्रमाकांची दुचाकी कार्यालयासमोर सार्वजनिक जागी उभी केली होती. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांना त्यांची दुचाकी दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने सुनील पाटील यांनी सात दिवसाानंतर बुधवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार २० हजारांची दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील हे करीत आहेत

Protected Content