कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

आकाशवाणी चौकातील घटना; रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात कारणे दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शनिवार, 7 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता घडली. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

महाबळ परिसरातील सुरेश नगर येथे विनोद मधुकर भावसार वय 48 हे वास्तव्यास आहेत. शनिवार, 7 जानेवारी रोजी विनोद भावसार हे दुपारी अडीच वाजता आकाशवाणी चौकातून महामार्गावरून दुचाकीने जात असताना एम.एच.19 .बी.एच.0023 या क्रमाकांच्या कारने भावसार यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत भावसार जखमी झाले. अपघातानंतर कारचालक घटना स्थळाहून पसार झाला. याप्रकरणी विनोद भावसार यांनी दिलेल्या तक्रारीवरून कार चालकाविरुद्ध रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक चंद्रकांत पाटील हे करीत आहेत .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content