कामापेक्षा कृतीवर अधिक भर द्यावा : अंजली जैन

अखंड भारत सेनेच्या जिल्ह्याभरात शाखा सुरू होणार

जळगाव, प्रतिनिधी | सामाजिक कार्य तर आपण करीत आहोत, मात्र कामापेक्षा कृतीवर अधिकाधिक भर द्यावा. संघटना वाढीसाठी सदस्यांनी सातत्याने प्रयत्नरत राहावे, असे मार्गदर्शन अखंड भारत सेनेच्या प्रदेशाध्यक्ष अंजली जैन यांनी जिल्हा मेळाव्यात उपस्थित सदस्यांना केले. पुढील काळात जिल्ह्यात संपर्क कार्यालयासह विविध शाखा सुरू करण्यावर भर दिला जाईल असेही त्यांनी सांगितले.

 

अखंड भारत सेनेतर्फे रविवार दि. २१ नोव्हेंबर रोजी जिल्हा मेळावा अदिती हॉल येथे घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश मुख्य अध्यक्ष राजू वैष्णव, राज्याच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा अंजली जैन, प्रदेश वरीष्ठ उपाध्यक्षा वैशाली सोलंकी उपस्थित होते.

सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष अंजली जैन यांनी श्री गणेशाच्या मूर्तीला माल्यार्पण करीत वंदन केले. तसेच, दीपप्रज्वलन करून मेळाव्याला प्रारंभ केला. यानंतर प्रदेश वरीष्ठ उपाध्यक्षा वैशाली सोलंकी यांनी प्रस्तावना केली. प्रस्तावनेत, संघटनेची ध्येयधोरणे, संघटनेची पूर्ण माहिती, कामाची रचना याविषयी माहिती दिली. देशभरात अखंड भारत सेनाच्या शाखा असून मानवहिताच्या दृष्टीने कार्य करते, असेही त्या म्हणाल्या.

राजू वैष्णव यांनी सांगितले की, संघटना वाढीसाठी समर्पण महत्त्वाचे आहे. महिला पदाधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यासाठी पुढे आले पाहिजे.त्यांना संघटनेतर्फे पूर्णपणे मदत केली जाईल.

मेळाव्यासाठी प्रदेश महिला मोर्चा महासचिव फाल्गुनी जोगी, प्रदेश महासचिव सारिका चव्हाण, (अकोला), मिलन महाजन, (भुसावळ), विशाल तायडे (अकोला), अनिल मोरे (अहमदनगर), तृप्ती पाटील, प्रज्ञा सोलंकी आदींनी परिश्रम घेतले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!