कापूस व कांद्याला भाव देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे अनोखे आंदोलन

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जामनेर येथे कपाशीला भाव मिळत नसल्यामुळे काँग्रेस पार्टी तर्फे शिंदे फडणवीस सरकारचा दशक्रिया करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी सत्ताधारी यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

 

शेतकऱ्याचा कपाशीला कांद्याला त्याचबरोबर विविध पिकाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे जामनेर तालुका काँग्रेस पार्टी तर्फे जामनेर तहसील कार्यालयासमोर शिंदे फडणवीस सरकारचा दसवीधी कार्यक्रम आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष शंकर राजपूत, काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंडन करून निषेध केला. यावेळी शेतकऱ्यांच्या कापसाला १५ हजार रुपये भाव देण्यात यावा, कांद्याला पाच हजार रुपये भाव मिळावा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळावी, पोखरा योजना पुन्हा चालू करण्यात याव्या, अशा विविध शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी निषेध निवेदन तहसीलदार यांना जामनेर तालुका काँग्रेस पार्टी तर्फे देण्यात आले यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content