कानळदा रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू 

जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कानळदा रस्त्यावरील उत्कर्ष हॉटेलजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात नुतन मराठा महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचा-याचा मृत्यू झाला.

गुरूवारी 10 नोव्हेंबर रात्री ८.३० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून प्रशांत भिकनराव कोळी (४२, रा.उत्तम पार्क, कोल्हे हिल्स परिसर) मयताचे नाव आहे. तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे.

उत्तम पार्क येथील रहिवासी प्रशांत कोळी हे नुतन मराठा महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी होते. गुरूवारी ते त्यांच्या मुळगाव नांद्रा येथील शेतात दुचाकीने गेले होते. रात्री शेतातून घरी परतत असताना कानळदा रस्त्यावरील उत्कर्ष हॉटेलजवळ त्यांच्या व एका दुचाकीचा समोरासमोर अपघाता झाला. या अपघातात प्रशांत कोळी यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा दुचाकीवरील चालक हा गंभीर जखमी झाला. कोळी व दुस-या जखमी दुचाकीस्वाराला तातडीने नागरिकांनी जिल्हा रूग्णालयात वाहनाने हलविले. वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती कोळी यांना मृत घोषित केले. तर दुस-या दुचाकीस्वारावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content