कांदा निर्णयाविरोधात काँग्रेस कमिटीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन (व्हिडीओ)

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी आज भाजप सरकार विरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संदर्भात विविध मागण्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जगभरात लॉकडाऊन असताना मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पन्न घेतले. कांद्याला आता कुठे चांगला भाव येऊ लागत लागल्याने दिसत होते. चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण केंद्रातील मोदी सरकारने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. तीन महिन्यापूर्वी म्हणजे ४ जून २०२० रोजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करून स्वतःची पाठ थोपटवून घेतली होती आणि ३ महिन्यात घुमजाव करत निर्णय बदलून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या कांदा निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारने तत्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज 16 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!