काँग्रेस सेवा फाउंडेशन तालुकाध्यक्षपदी अभय महाजन

शेअर करा !

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील सातोद येथील युवा सामाजीक कार्यकर्ते यांची तालुका काँग्रेस सेवा फौंडेशनच्या तालुका अध्यक्षपदी अभय प्रभाकर महाजन यांची निवड करण्यात आली आहे तसेच फैजपूर शहरध्यक्षपदी हर्षल यशवंत दाणी यांची निवड करण्यात आली आहे.

तालुका काँग्रेस सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षपदी अभय महाजन यांची तर फ़ैजपूर शहराध्यक्षपदी हर्षल यशवंत दाणी यांची निवड प्रदेशाध्यक्ष अॅड. सुभाषचंद्र गोडसे यांच्या आदेशाने सेवा फाउंडेशन जळगाव जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांनी केली आहे सदर निवडीबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीपभैय्या पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी, माजी आमदार रमेशदादा चौधरी, जिल्हा परिषदेचे गटनेते अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे,जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बापूसाहेब अजबराव पाटील, काँग्रेस सेवा फौंडेशनचे प्रदेश सरचिटणीस गौरवसिंग चौहाण, हाजी शब्बीर सेठ, लीलाधरसेठ चौधरी, प. स. गटनेते शेखरदादा पाटील, यावल शहरध्यक्ष कदिरभाई खान, भगतसिंगबापू पाटील,नितीन दादा चौधरी, युवानेते संदीपभैय्या सोनवणे, काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, जिल्हा सचिव भूषण निंबायत, नईमभाई, रहेमान खाटीक, अनिल जंजाले, अनिल महाजन, प्रसन्न महाजन, फैजपूर शहराध्यक्ष रियाज भाई ,कलीम भाई ,केतन किरंगे,काँग्रेस पक्षाचे फैजपूर शहराचे सर्व नगरसेवक यावलचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते , कोळवद गावाचे मा.सरपंच अनिल पाटील, सतोद कोळवद गावाचे फैजपूर शहराचे आणि यावल तालुक्याचे सर्व नेते कार्यकर्ते आदींनी निवड झालेल्या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून अभिनंदन केले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!