कवठळ विकासो निवडणुकीत ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कवठळ येथे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक १३ जागांसाठी नुकतीच पार पडली. ह्या निवडणुकीत ग्रामविकास परिवर्तन पॅनलने २ जागांवर बिनविरोध तर ११ जागांवर दणदणीत विजय संपादित केला.

 

ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध तर ११ उमेदवाराचा मोठ्या फरकाने एकतर्फी विजय झाला.कवठळ येथे २५ वर्ष्यानंतर पहिल्यांदाच निवडणुकीत एवढा उत्साह उमेदवार आणि मतदार यांच्यात दिसून आला. राजेंद्र पितांबर सोनावणे हे अनुसूचितजाती मधून तर विनोद प्रभाकर पवार हे इतर मागास वर्गमधून बिनविरोध निवडून आले. तसेच अनुसयाबाई रमेश पाटील व बेबाबाई आधार पवार ह्या महिला प्रवर्गातून मोठ्या फरकाने विजय झाल्या. विशेष मागास वर्ग मधून मांगो तोताराम सोनावणे यांचा विजय झाला तसेच कर्जदार प्रवर्गातून चंद्रकलाबाई सुभाष पाटील, बाळू राघो पाटील, कासूबाई रामदास पाटील, आशाबाई अशोक पवार, वसंत रावा पवार, गोकुळ बाबुराव सोनावणे, दादाराम शहादु पवार व गोपीचंद रामा सोनावणे यांचा एकतर्फी विजय झाला. ह्या निवडणुकीत सर्व मतदार तसेच भगवान पुढारी, माधव आत्माराम पाटील व सरपंच योगेश दगडू पवार यांचे सहकार्य लाभले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!