भुसावळ संतोष शेलोडे । संचारबंदीमध्ये सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात असुविधा होत असतांना येथील बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या कर्मचार्यांनी अंत्यसंस्कारासाठी लागणार्या सामानासाठी मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
याबाबत वृत्त असे की, शनि मंदिर वॉर्ड परिसरातील इसमाचे सायंकाळी निधन झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारा सामान घेण्यासाठी बाजारात गेले असता सर्व दुकाने बंद होती. यावेळी सराफ बाजारात गस्तीवर असणार्या बाजारपेठ स्थानकाच्या कर्मचार्यांनी मोतीराम काळूराम दुकानाच्या संचालकांना पाचारण करून दुकान खोलण्यास लावले. यासोबत त्यांनी अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असणार्या सामग्रीसाठी अन्य दुकानदारांना बोलावून संबंधीतांची मदत केली. याबाबत त्यांचे कौतुक होत आहे.
पहा : याबाबतचा हा व्हिडीओ वृत्तांत.