कर्नाटकात २४ रुग्णांचा मृत्यू कि हत्या ? ; राहुल गांधी संतापले

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कर्नाटकात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात, मेले की मारलं? त्यांच्या कुटूंबियांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. व्यवस्थेला जाग येण्याआधी अजून असा किती त्रास सहन करावा लागणार आहे?

 

देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये वैद्यकीय सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे अनेक रुग्णांनी आपला जीव गमावल्याच्या घटनाही घडत आहे. रविवारी रात्री कर्नाटकातल्या कामराजनगर जिल्ह्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

 

 

 

 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. लवकरच स्वतः दखल घेत चौकशी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.