कराटे स्पर्धेत पदक पटकवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार

अमळनेर, प्रतिनिधी | नाशिक जिल्ह्यात झालेल्या खुल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत अमळनेरच्या १३  विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदके तर ६ रौप्य पदके मिळवली आहेत.विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पदक देऊन सत्कार करण्यात आला.

 

नाशिक खुल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक जयपाल हिरे , मुख्याधिकारी प्रशांत सरोदे ,पिबीए स्कूलचे चेअरमन प्रदीप अग्रवाल , प्रशासन अधिकारी संजय चौधरी , माजी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील प्रमुख अतिथी म्हणून हजर होते. उत्कृष्ट संघ प्रशिक्षक म्हणून सुशील करंदीकर याचा देखील ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. श्रावणी खंडाळे, दर्शना गव्हाणे, पूर्वा चौधरी, दुर्गेश्री ठाकरे, मयंक पाटील, पूर्वशी संजय पाटील, प्रियम शिंदे, ऋषिकेश खंडाळे, सिद्धार्थ संदानशीव, पूर्वा ठाकरे, शाहू देशमुख, कुणाल पाटील, साहिल ठाकरे, निलेश नगराळे, गुणवन्त शिरोडे, मकरंद सोनवणे, हिमांशू पांडव, कृष्णा गोसावी, गौरव चौधरी या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी तर आभार सुनील करंदीकर यांनी यांनी मानले

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!