करणी सेनेच्या वतीने क्रांतीसुर्य महाराणा प्रताप पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन

जळगाव-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील करणी सेनेच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता महाराणा प्रताप पुतळा येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील महाराणा प्रताप पुतळा येथे प्रतिमेचे पुजन समाजाच्या मान्यवरांच्याहस्ते गुरूवार १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले. याप्रसंगी बापूराव साळुंखे, एस.के. सोनवणे यांनी क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या कार्याला उजळा देत अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष निलेशसिंग राजपूत, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी विजयसिंह परदेशी, बापूराव साळुंखे, करणी सेनेचे जिल्हा उपप्रमुख दीपक राजपूत, विठ्ठलसिंग मोरे, किरण राजपूत, पवन राणा, राजू राजपूत, कौशल राजपूत, भूषण राजपूत, शुभम राजपूत, एस.के. सोनवणे, सतीश शिंदे, धनंजय कीर्तने, निलेश पाटील, स्वप्निल परदेशी, पराग पाटील, विलास जाधव, नारायण पाटील, कल्याणी होळ, विनोद शिंदे यांच्यासह राजपूत समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content