करगाव विकास सोसायटीच्या चेअरमनपदी बाबुराव मराठे

 

चाळीसगाव, प्रतिनिधी ।  तालुक्यातील करगाव विकास सोसायटीचे एक वर्षाच्या मुदत संपल्यानंतर चेअरमन व व्हाईस चेअरमन पदी बाबुराव मराठे तर व्हाईस चेअरमन राजू चव्हाण यांची निवड करण्यात आली. 

आज एस. व्ही. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली येथील सहकारी सोसायटीच्या कार्यालयात चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड करण्यात आली. करगांव विकास सोसायटीच्या एक वर्षाच्या कार्यकाळ संपल्यानंतर माजी चेअरमन दिनकर राठोड व व्हाईस चेअरमन छबीबाई गोफणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन करगांव विकास सोसायटीच्या चेअरमनपदी बाबुराव मराठे तर व्हाईस चेअरमन राजू चव्हाण यांची निवड सोसायटीच्या कार्यालयात सकाळी ९:५० वाजताच्या दरम्यान करण्यात आली. विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदांची निवड यावेळी एस. व्ही. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. याप्रसंगी सोसायटीचे सचिव माणिकराव पाटील, संचालक मंडळ दिनकर राठोड,  रमेश राठोड, अशोक पाटील, आत्माराम पाटिल, रामदास पाटील, खुमानसिंग पाटिल, देवकाबाई पवार, छबीबाई गोफणे, जिजाबाई पाटिल, शिपाई संदिप पवार, सदू पवार, गोरख गोफणे व उदल पवार आदी उपस्थित होते. माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर लगेच आपला राजीनामा दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे. तसेच दर वर्षाला नवीन चेहर्याला संधी मिळणार आहे.

Protected Content