कदापी कॉंग्रेस सोडणार नाही : पृथ्वीराज चव्हाण

कराड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या अनेक दिवसांपासून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत संशयकल्लोळ सुरू असतांना त्यांनी आज याबाबत जाहीर भाष्य केले आहे.

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे गेल्या अनेक महिन्यांपासून कॉंग्रेस नेतृत्वावर टीका करत होते. यामुळे ते पक्ष सोडणार असल्याचा चर्चांना उधाण आले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज त्यांनी कराडात पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी ते म्हणाले की, मी कॉंग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या आहेत हे मला माहित नाही. पण मी कॉंग्रेसच्या विचाराचा आहे. आपण कॉंग्रेस पक्षात पूर्णवेळ अध्यक्ष असावा, अशी मागणी ऑगस्ट २०२० मध्ये आम्ही केली होती. ती मागणी सोनिया गांधींनी मान्य केली असून आपण त्यांचे आभारी असल्याचे ते म्हणाले.

चव्हाण पुढे म्हणाले की, कॉंग्रेसचा अध्यक्ष थेट नेमणुकीमुळं होऊ नये. त्यासाठी निवडणूक व्हावी, अशी आमची मागणी होती. ती आता मान्य झाली आहे. यामुळे आपण कदापी पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Protected Content