कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला

दोघांविरोधात यावल पोलिसांत गुन्हा दाखल

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी गावाजवळ काही युवकांच्या जागृतेने कत्तलीच्या उद्देशाने गुरढोरांची बेकायद्याशीर वाहतुक करणारा टाटा आयसर ट्रक यावल पोलीसांनी पकडला असुन याबाबत पोलीसात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या संदर्भात पोलीस सुंत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, आज दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ , ३० वाजेच्या सुमारास फैजपूर यावल मार्गावरील सांगवी गावाजवळ रस्त्यावर टाटा आयसर एमएच ०६ एजी७६८९या चार चाकी वाहनातुन सावदा येथुन चोपडा येथे कत्तलीच्या उद्देशाने वाहनात अत्यंत निर्दयीपणे कोंबुन गुरढोरांची वाहतुक करण्यात येत होती. याची माहीती काही जागृत युवकांकडुन मिळताच पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांना मिळताच यावल पोलीसांनी तात्काळ सांगवी गावाजवळच्या मार्गावर असलेले ट्रक व त्यातील ९ जनावरे ताब्यात घेतले आहेत.

याबाबत यावल पोलीस स्टेशन मध्ये वाहन चालक शेख मुजाहीद शेख रज्जाक रा . चोपडा आणी क्लिनर शेख मुश्तका शेख बिस्मिल्ला रा . चोपडा जि .जळगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांनी तात्काळ जळगाव येथील आर .सी .बाफना यांच्या गौशाळेत सर्व गुरेढोरे पाठवण्यात येत असल्याची माहीती पोलीसांनी दिली आहे .

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.