औषधांच्या गोदामाला भीषण आग (व्हिडीओ)

महापालिकेचे अग्निशमन विभागाचे ४ बंब दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गुजराथी गल्लीमधील सुरज एजन्सी दुकानाच्या तळमजल्यावरील औषधांच्या गोदामाला शुक्रवारी ५ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये लाखो रूपयांचा माल जळून खाक झाला आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या चार बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

अधिक माहिती अशी की, जिल्हापेठ भागातील गुजराथी गल्लीमध्ये सुरज एजन्सी फार्मास्यूटीकल ॲण्ड डिस्टीब्युटरर्स नावाने दुकान आहे. या दुकानाच्या तळमजल्यावर औषधांचा साठा असलेले गोडावून आणि कार्यालय असून शुक्रवारी हे गोडावून बंद असताना अचानक आग लागली. गोडावूनमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघत होते. हे धनंजय बारी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाच्या कार्यालयाकडे धाव घेवून अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी यांना आगीची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या चार बंब घटनास्थळी दाखल झाले. दीड ते पाऊण दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे देविदास सुरवाडे, संजय भोईटे, प्रकाश कुमावत, युसूफ पटेल, रवींद्र सपकाळे, रोहिदास चौधरी, तेजस जोशी, दिलीप पवार, गिरीष खडके, राजेंद्र रानवडे, सरदार पाटील, परमेश्वर सोनवणे आदी जवानांनी परिश्रम घेतले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content