औरंगाबाद सभेसाठी फौजफाटा तैनात

मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवर पोलिसांच्या नोटीससह करडी नजर

मुंबई/औरंगाबाद, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे महाराष्ट्रदिनी औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार असून या सभेसाठी सहा हजाराहून अधिक पोलिसांसमवेत एसआरपीएफच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

राज ठाकरे याची १ मे रोजी होणारी सभेला होणारी गर्दी लक्षात घेता, प्रशासनाकडून चोख सुरक्षा व्यवस्था केली जात आहे. शहरातील उपलब्ध पोलीस दलातील सुमारे 6 हजाराहून अधिक कर्मचारी, यात ३ उप आयुक्त, ६ सहायक उप आयुक्त, ३० पोलीस निरीक्षक, २५० च्यावर पोलीस उपनिरीक्षक यांचेसह अडीच हजाराहून पोलीस कर्मचारी तैनात आहेत.

त्यासोबतच राज्य राखीव पोलीस दलाच्या १२० जणांची एक याप्रमाणे ६ तुकड्या यात ७२० एसआरपीएफ जवान शनिवारी औरंगाबाद शहरात येतील, तर शेजारच्या जालना तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील राज्य राखीव पोलीस दलाची आवश्यकता असल्यास अन्य जिल्ह्यातील तुकड्या देखील मागवण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला होणारी गर्दीची शक्यता लक्षात घेता गुप्तचर विभाग यंत्रणाच्या अहवालानुसार या सभेनंतर समाजविघातक घटकाकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जाण्याची देखील शक्यता असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!