ओरियन सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांची उंच भरारी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा के.सी.ई.सोसायटी संचलित ओरियन सी.बी.एस.ई. सिनीयर सेकंडरी  स्कूलच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

 

शाळेतील यशस्वी तुषार तळेले या विद्यार्थींनीने  ९२.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. तसेच 92.60% टक्के गुण मिळवत तनवी प्रशांत गायधने ह्या विद्यार्थ्यांनीने द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे तर 90% टक्के गुण मिळवत सोम्या मेहता हि विद्यार्थीनी  तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. विद्यार्थ्यांना प्राचार्या सुषमा कंची आणि इतर सर्व शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर नियमित अभ्यास आणि अखंडित सराव यामुळेच विद्यार्थ्यांनी हे उत्तुंग यश संपादित केलेले आहे. त्यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रज्ञावंत श्री.नंदकुमार बेंडाळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे . स्कूलच्या प्राचार्या सौ. सुषमा कंची यांनी देखील विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच स्कूलच्या उपप्राचार्या सौ.मीना चॅटर्जी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content