ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेत रियान तडवी चोपडा तालुक्यातून प्रथम

चोपडा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   येथील पंकज विद्यालयाचा विद्यार्थी रियान तडवी याने ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेत  यश मिळाले असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

चोपडा तालुक्यातील श्रीमती अ. खा. पाटील माध्यमिक विद्यालय मंगरूळ येथील शिक्षक सादिक तडवी यांचा मुलगा रियान तडवी याला ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळाले आहे.  त्याच्या या यशामध्ये शारदा जुनिअर क्लासचे शिक्षक अभिषेक शुक्ल सर तसेच विद्यालयातील शिक्षक व पालक या सर्वांनी परिश्रम घेतले असून त्याच्या या यशाबद्दल रिहानचे,पालक यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

Protected Content