जळगाव प्रतिनिधी । पारोळा येथील व्यावसायिकाची फसवणूकप्रकरणात दाखल गुन्ह्यातील दोन संशयित आरोपीचा अटकपुर्व जामीन जळगाव जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
याबाबत माहिती अशी की, फ्रॅंचाईजी देतो व त्या बदलात तुमच्या दुकानासाठी दरमहा भाडेसुध्दा दिले जाईल” असे फोनवरुन कळविले. “त्यासाठी अँडव्हान्स म्हणून पाच लाख रुपये जमा करावे लागतीन असे सांगितले”. त्यामुळे फिर्यादीने संबंधितांनी दिलेल्या बँकेतील खात्यावर वेळोवेळी रक्कम रुपये पाच लाख जमा केले. मात्र, त्यानंतर या संशयितांनी ठरल्याप्रमाणे कोणताही माल पाठवला नाही. तसेच दुकानासाठी फर्निचरसुध्दा करुन दिले नाही. त्यामुळे पारोळा येथील व्यावसायिक संजय मोहनलाल शर्मा यांनी जळगाव सायबर पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून साईराम बालाजी पाटील व परमेश बालाजी पाटील (दोन्ही रा. हैद्राबाद) यांच्याविरुद्ध सायबर पोलिसात गुन्हा दाखल आहे. संशयित दोघांनी जळगाव जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता त्यावर शनिवारी जळगांव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात कामकाज झाले. न्यायाधीश ठुबे यांनी दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड केतन ढाके यांनी काम पाहिले