ऑक्सिजन विकेत घेण्याची वेळ येऊ नये म्हणून आताच वृक्ष लागवड करा – वनपाल उज्वला पाटील

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पुढच्या पिढीला ऑक्सिजन विकेत घेण्याची नोबत येऊ नये म्हणून आताच वृक्ष लागवड करा वाढत्या वृक्षतोडमुळे निसर्गाचे समतोल पूर्ण बिघडले आहे. याकडे जागृत नागरीकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत वनपाल उज्वला पाटील यांनी व्यक्त केला.

 

जागतीक पर्यावरन दिनानिमित्त सामाजिक वनीकरणतर्फे ठिक-ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी पुनखेडा गावातुन रॅली काढून जन-जागृती करण्यात आली.तसेच वृक्ष लागवड करण्याचे संदेश देण्यात आले.

 

यावेळी वनपाल उज्वला पाटील, सरपंच किर्ती पाटील, उपसरपंच सुरेश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला पाटील, डिंगबर बोरसे, अंगनवाडी सेविका आशा कोळी, मदतनिस हर्षाली कोळी, जोस्ना कोळी, ज्योती रायमळे, वंदना गोसावी, सुरेखा चौधरी, सरला पाटील, मंगला कोळी, राधा पाटील, नामदेव कोळी, प्रतिभा पाटील, ज्योती चौधरी, सुनिता कोळी, संगीता पाटील, नरेंद्र पाटील, आदी यावेळी मोठ्या संख्येने वृक्षप्रेमी उपस्थीत होते.

Protected Content