एसबीआय बँकेसमोर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मुख्य स्टेट बँकेसमोरुन जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली.

पंकज खरे असे जखमी तरुणाचे नाव असल्याची माहिती मिळाली असुन त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,  पंकज खरे हा त्यांचा जळगाव शहरातील रिंगरोड परिसरात राहणारे मित्राची  दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी.सी.१५०)  घेऊन जिल्हा रुग्णालयात त्यांच्या नातेवाइकाला पाहण्यासाठी गेला होता. जिल्हा रुग्णालयातून परतत असताना  स्टेट बँकेसमोर  नवीन बसस्थानकाकडे  जाणार्‍या चारचाकीने (क्र. एम.एच.१९ सी.वाय.९९३९) दुचाकीला जोरदार धडक दिली. पाच ते दहा फूट दुचाकींसह तरुणाला कारने फरफटत नेले. व न थांबता वेगाने पसार झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठले. ये जा करणाऱ्या वाहनधारकांनी गंभीर जखमी झालेल्या या तरूणास जिल्हा रुग्णालयात हलविले. रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पाेलिसांची कारवाई सुरू होती.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.