एसटी बँक निवडणूकीबाबत सदवर्तेंची मोठी घोषणा !

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । महामंडळाच्या बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी रणशिंग फुंकण्याची मोठी घोषणा केली.

एसटी महामंडळाच्या बँकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित संघटनेची सत्ता आहे. या संघटनेच्या विरोधात सदावर्तेंनी घोषणा केलेली संघटना निवडणूक लढणार आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “बँक ही सहकार क्षेत्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक व्यक्ती, एक पद याप्रमाणे बँक, मत आणि उमेदवारीची प्रक्रिया निश्चित केलीय. बँक कोणाच्या बापाच्या घरची नाही. बँकेत कोणाला भ्रष्टाचार करण्यास मोकळीक दिलेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळातील कष्टकरी स्वतः स्वतःची माणसं निवडतील. आतापर्यंत राजकीय बॉसकडून शेतातील बुजगावण्याप्रमाणे लोकं उभी केली जात होती. आमची बँक, आमचा पैसा, आमचे कष्ट, आमचे श्रम आणि पैसा मर्जीतील लोकांना दिला जायचा. इतर राज्यांना ७ टक्क्याने पैसे दिले जातात तर इकडे ७ टक्क्याने पैसे का दिले जात नाहीत, हे आमचं म्हणणं आहे,” असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!