एसटी चालकाने केली रेल्वेखाली आत्महत्या

कर्मचाऱ्याने नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एका एसटी चालकाने शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीसमोर डाऊन लाईनवर रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहचले असून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.

 

शिवाजीनगर अमरधाम समोर खांबा क्रमांक ४२०/२९/अ डाऊन लाईनवर सकाळी १० वाजेपुर्वी रेल्वेखाली आल्याने एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना १०.३० च्या सुमारास गँगमनच्या निर्दर्शनास आली. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे हवालदार करुणासागर जाधव व आरपीएफचे सुरेश मीना हे पोहचल्यानंतर पुढील कार्यवाहीला सुरुवात झाली. रुग्णवाहिका पोहचल्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास मृतदेहाचे खिसे तपासले असता एक डायरी मिळून आली. डायरीत असलेले ओळखपत्र आणि सुसाईड नोट वरून त्यांची ओळख पटली आहे. माझी मनस्थिती खराब असल्याने मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे. माझ्या आत्महत्येशी माझ्या परिवाराचा काहीही संबंध नाही असा उल्लेख त्यांनी केला आहे. शिवाजी पाटील यांच्या आत्महत्यामुळे जळगाव जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या तिसऱ्या आत्महत्येची नोंद झाली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content