एसएसडी मार्केटला आग (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । येथील पाच मजली एस. एस.डी. मार्केटमधील लिफ्टसाठी सोडण्यात आलेल्या डक मध्ये टाकलेल्या खराब कपड्यांमध्ये अचानक आग  खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाच्या दोन बंब ही आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न करीत आहे.

 

ग.स. सोसायटी समोरील गल्लीत असलेल्या एस.एस.डी. मार्केटमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. या मार्केटच्या लिफ्टसाठी सोडण्यात आलेल्या डकमध्ये काही दुकानदारांनी खराब कपडे टाकून ठेवलेले आहेत. या कपड्यांना दुपारी २.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. याबाबत अग्निशमन दलास दुरध्वनीवरून कळविले असता  दोन बंब लागलीच घटनास्थळी दाखल झाले.  पाच माजली एस.एस.डी. मार्केटच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत ही आग पोहचली आहे. आज रविवार असल्याने दुकाने बंद असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मार्केटमधून आगीचे लोळ बाहेर पडत असल्याने बघ्यांनी एकच गर्दी केली होती. आग कशाने लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.  अग्निशमन दलाचे कर्मचारी  रवी बोरसे,भगवान जाधव,दिनेश धर्माधिकारी, विक्रांत घोडेस्वार,वसंत न्हावी,नंदू खडके,सोपान कोल्हे,नासीर अली शौकत अली,संतोष तायडे,रोहिदास चौधरी, भगवान पाटील,नितीन बारी आदी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!