: नवी दिल्ली वृत्तसंस्था । प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकने गोळीबार केल्यानंतर भारताने आज जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे बंकर उध्वस्त केले असून यात किमान वीस सैनिक ठार झाले असून 15 जखमी झाले आहेत.
पाकिस्तानी सैन्याने आज आज सिझ फायर चे उल्लंघन करत जोरदार गोळीबार केला. यात सेनेचे तीन तर बीएसएफचा एक जवान शहीद झाला. यानंतर दुपारी भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानची बनकर उद्ध्वस्त केले. यात पाकिस्तानचे अनेक बंकर उद्ध्वस्त झाले असून किमान वीस सैनिक ठार झाल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे. भारतीय लष्कराने यासंदर्भातले व्हिडिओदेखील जारी केले आहेत. यात 20 पेक्षा जास्त जवान ठार झाले असून किमान पंधरा व त्यापेक्षा जास्त सैनिक जखमी झाल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे.