एरंडोल शहरात भाजपातर्फे वीजबिलांची होळी .

शेअर करा !

एरंडोल :प्रतिनिधी । शहरात भाजपातर्फे महावितरणच्या विज बिलांची होळी करून रा.ती काबरे विद्यालय जवळील शांताराम दादा चौकात आंदोलन करण्यात आले.

. लॉक डाऊन मुळे आर्थिक तणावाखाली असलेल्या जनतेला अकारण मोठ्या वीज बिलाचा शॉक दिला आक्रोश निर्माण झाल्यावर सवलत देण्याचे महाविकास आघाडीच्या सरकारच्या नेत्यांनी जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जा मंत्र्यांनी वीज बिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना वीज बिले भरावीच लागतील असे सांगितले आहे.
दुसरीकडे महावितरण सक्तीने वीज बिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे.सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतुन जागी करून जनतेला सवलत देण्यास भाग पाडू. असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले .
आंदोलनात अशोक चौधरी (जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा), माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, सुनील पाटील (संगायो माजी अध्यक्ष) , अमोल जाधव (तालुका सरचिटणीस) , राजेंद्र पाटील , माजी तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटील, संजय चौधरी, सचिन पाटील (लोकसभा क्षेत्र विस्तारक), प्रशांत महाजन (तालुका युवा मोर्चा अध्यक्ष) ,आबा चौधरी ( जिल्हा अध्यक्ष व्यापारी आघाडी) , ऋषिकेश पाटील, अजित पाटील , डॉ वाघ , वाल्मीक सोनवणे ,व पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!