एरंडोल राष्ट्रीय समाज पक्षाचे विविध मागण्यांचे निवेदन

शेअर करा !

 

एरंडोल, प्रतिनिधी । राष्ट्रीय समाज पक्षातर्फे तहसिलदार अर्चना खेतमाळी यांना अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीमुळे नुकसान भरपाई म्हणुन ५०,००० हजार रुपये हेक्टरी मिळावे अशी मागणी करण्यात आली.

एरंडोल शहरातील बेघर व अतिक्रमणधारकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा व मुख्याधिकारी किरण देशमुख यांना एरंडोल शहरातील शासकीय जागेवर अतिक्रमणधारक सर्व जे २० ते २५ वर्षांपासून रहिवाशी आहेत व नगर पालिकेची नळ पट्टी,घर पट्टी हे सर्व प्रकारचे कर भरतात यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी, उपतालुका अध्यक्ष अभय सिंग पवार,सरचिटणीस गोपाल महाजन,शहराध्यक्ष सागर भोई, गट प्रमुख शिवा राठोड, शहरातील अतिक्रमणधारक व शेतकरी उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!