एमएचटी-सीईटी प्रवेश परिक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्ष, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचेमार्फत MHT-CET राज्य सामाईक प्रवेश परीक्षा २०२३ हि ऑनलाईन पध्दतीने PCM ग्रुप ९ ते १४ मे, 2023 व PCB ग्रुप १६ ते २१ मे अशी एकूण १२ दिवस जळगाव जिल्ह्यातील एकूण ४ परीक्षा केंद्रावर सकाळी ७.३० ते दुपारी १२  प्रथम सत्र व दुपारी १२.३० ते सायंकाळी ६.४५ व्दितीय सत्र अशी दोन सत्रात घेण्यात येणार आहे.

 

जिल्हादंडाधिकारी यांच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात दिनांक 9 ते 14 मे, 2023 व PCB ग्रुप 16 ते 21 मे, 2023 या कालावधीत परिक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये. यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) अन्वये जळगाव जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या MHT-CET राज्य सामाईक प्रवेश परीक्षा 2023 परिक्षा केंद्रांच्या ठिकाणी दिनांक 9 ते 14 मे, 2023 व PCB ग्रुप 16 ते 21 मे, 2023 या कालावधीत पेपर सुरु झालेपासून ते पेपर संपेपर्यंतच्या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील सर्व परिक्षा केंद्राचे 200 मीटर परिसरात कोणीही प्रवेश करू नये असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी रविंद्र भारदे यांनी पारित केले आहे.

 

हा आदेश परिक्षार्थी, नियुक्त अधिकारी / कर्मचारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. सर्व परिक्षा केंद्राजवळच्या 200 मीटरच्या आतील परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने हे नमूद कालावधीत पेपर सुरु झालेपासून ते पेपर संपेपर्यंतच्या कालावधीत बंद राहतील. असे अप्पर जिल्हादंडाधिकारी रविंद्र भारदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content